शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

सोशल मीडियाद्वारे त्रास देणारा जेरबंद, तरुणींना पाठवित होता अश्लील संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:18 AM

पुण्यासह अन्य शहरातील तरुणींना फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे.

न-हे  - पुण्यासह अन्य शहरातील तरुणींना फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रविकुमार पासवान (वय २९, सध्या : कोल्हापूर, मूळ बिहार) विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लील संदेश पाठवून आरोपी त्रास देत होता. फिर्यादीने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर स्वत:चे फोटो अपलोड केले होते, आरोपीने या तरुणीस फॉलो करून तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तरुणीच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील फोटो पाठवून पुणेरी कॉल गर्ल म्हणून तिचे नंबरही त्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते; तसेच तिला फोन करून त्याने १ लाख रुपयांची मागणीही केली असल्याची तक्रार या तरुणीने दिली.रविकुमार पासवान हा तरुण गेल्या १३ वर्षांपासून पुण्यातील वारजे, पिंपरी आदी वेगवेगळ्या परिसरात राहत होता. एक महिन्यापूर्वीच तो कोल्हापुरातील एका कंपनीत सीएनसी आॅपरेटर म्हणून दरमहा १८ हजार पगारावर काम करण्यास गेला होता. आरोपीचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले असले, तरी तो फेसबुक व इन्स्टाग्राम अत्यंत कुशलतेने वापरत होता. त्याने आत्तापर्यंत ५० ते ६० तरुणी व महिलांना अशाप्रकारचे अश्लील संदेश पाठवले असल्याची कबुलीही दिली आहे.या तरुणाबाबत अथवा अशाप्रकारच्या तरुणींना सोशल माध्यमातून अशाप्रकारचे संदेश आले असल्यास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केलेआहे.रविकुमार हा तरुण २००७ पासून पुण्यात राहत होता, मात्र २०१८ साली त्याला तीन ते चार तरुणींनी सोशल मीडियाद्वारे संभाषण करीत सुमारे ४० ते ५० हजार रुपयांना गंडा घातला होता. तेव्हापासून मी सर्वच तरुणींना सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे संभाषण करीत असल्याचे सांगितले.सोशल मीडीयातून विशेषत: तरुणी व महिलांना अशाप्रकारचे अश्लील संदेश पाठविण्याचे प्रकार वाढत असले, तरी तरुणींना घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार द्यावी.- क्रांतीकुमारपाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPuneपुणे