पिंपरी : भावासोबत भांडण करणाऱ्याला समजावून सांगत भांडण सोडवत असलेल्या तरुणीच्या अंगावर धावून जात तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. भोसरी येथे सोमवारी (दि. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश कैलास जाधव (वय ३४, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी यांच्या भावाशी विनाकारण भांडत होता. आरोपीने फिर्यादीच्या भावाला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या.त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या भावाचा मोबाईल फोन आपटून फोडून टाकला. त्यानंतर फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
भांडण सोडविणाऱ्या तरुणीचा विनयभंग, एकाला अटक ; भोसरीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 17:26 IST