मुंबई - दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस विशेष गाडीतून आणण्यात येणारे सुमारे २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आरपीएफने जप्त केले आहे. बॅगेतून अंमली पदार्थ आणणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.मंगळवारी दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस विशेष गाडीतून नायजेरियन प्रवास करत होता. गाडी निळजे-तळोजा येथे आली असता, नायजेरियने अलार्म चेन पुलिंग करून गाडीतून उतरला. नायजेरियन व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचा-याने त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता, सुमारे दोन कोटी रुपयांचे २.३ किलो अंमली पदार्थ आढळून आले आहे.कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी शिवाजी पवार यांनी नायजेरियनला पकडले.त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्याला दिवा येथील आरपीएफ ठाण्यात नेले. चौकशी केली असता, नायजेरियन व्यक्तीने नाव सनी ओचा आयके (४१) असे सांगितले. पासपोर्ट क्रमांक, नवी दिल्ली ते पनवेल, तृतीय वातानुकूलित डब्ब्यातून प्रवास केल्याचे सांगितले.एनबीएची घेतली मदतनायजेरियन व्यक्तीच्या बॅगची तपासणी केली असता, संशयास्पद पदार्थ आढळून आला. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), मुंबई यांच्याशी संपर्क करण्यात आला.
२ कोटींच्या अंमली पदार्थांसह एक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:45 AM