पिंपरी-चिंचवड (वाकड) : बेकायदेशीररीत्या पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या इसमाला वाकडपोलिसांनी पुनवळे येथील संत तुकाराम पुलावर रंगेहात पकडून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल जप्त केले. सुनिल वसंत सोळवे (वय २८, रा. माळवाडी, पुनवळे) असे त्याचे नाव आहे
याबाबत माहिती अशी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक गणेश गीरीगोसावी यांना त्यांच्या खास बातमी दारामार्फत माहिती मिळाली की पुनवळे येथील पूलावर स्वागत वोशिंग सेंटर समोर एक इसम पिस्तुल विक्री करण्यास येणार आहे त्यानुसार तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पाळत ठेवत त्याला ताब्यात घेतले, त्याची अंगझडती घेतली असता कमरेला गावठी कट्टा आढळला. त्याबाबत विचारणा केली असता त्याने तो विक्रीसाठी आणल्याचे कबुल केले. त्याच्यावर आर्म (ACT) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष माने, गणेश गिरीगोसावी, बिभीषण कन्हेरकर, सूरज सुतार, गणेश मालुसरे, प्रमोद कदम, धनराज किरनाळे, अशोक दुधवने, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सुरेश भोसले, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने केली.