शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

दिवाळीला घरी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; एकाच घरातील ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 11:44 AM

या अपघातात AE विनोद कुमार, त्यांची आई, पत्नी, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

बस्ती - शहरात भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होत आहे. वेगानं आलेल्या कारनं हायवेवर उभ्या असणाऱ्या कंटेनरला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती ज्यामुळे कार पूर्णत: कंटेनरमध्ये घुसली. या दुर्घटनेत पती-पत्नी, आई-मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेताना त्याने वाटेतच जीव सोडला. मुंडेरवा हद्दीत ही घटना घडली. 

विनोद कुमार हे प्रयागराजमधील जल निगममध्ये AE म्हणून तैनात होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब लखनौमध्ये राहत होते. रविवारी विनोद कुमार (४२) हे त्यांची आई सरस्वती, पत्नी नीलम (३४), मुलगी श्रेया आणि मुलगा यथार्थ यांच्यासह संत कबीरनगर येथे दिवाळी साजरी करण्यासाठी कारने जात होते. ते मूळचे खलीलाबाद परिसरातील हरपूर धोडही येथील रहिवासी होते. ब्रेझा कारमधील संपूर्ण कुटुंब लखनौहून निघाले होते.

रात्री महामार्गाच्या कडेला कंटेनर उभा होता. विनोद कुमार यांची कार वेगात होती. रात्री आठ वाजता अंधारात अंदाज न आल्याने पाठीमागून कार कंटेनरमध्ये घुसली. सर्वजण गाडीत अडकले होते यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अनेक अडथळ्यानंतर कार गॅस कटरने कापल्याने सर्वांची सुटका झाली. क्रेनच्या सहाय्याने गाडी कंटेनरमधून बाहेर काढण्यात आली.

या अपघातात AE विनोद कुमार, त्यांची आई, पत्नी, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, पाच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृताच्या जवळच्या आणि नातेवाईकांना माहिती देण्यात आली. 

बरेच दिवस हे कुटुंब गावी गेले नाहीविनोद कुमार हे कुटुंबासह लखनौमध्ये राहत होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी लखनौमध्येच शिकत असत. बरेच दिवस होऊनही ते गावी आले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे यावेळी दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात होते. अपघात झाला तेथून त्याच्या घराचे अंतर फक्त १७ किलोमीटर होते. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा क्षणार्धात मृत्यू झाला. आता कुटुंबात कोणीही उरले नाही. विनोदच्या वडिलांचे यापूर्वी निधन झाले होते.

रस्त्याच्या कडेला उभा होता कंटेनरविनोद यांची कार मागून ज्या कंटेनरमध्ये घुसली होती तो कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचे नियंत्रण सुटले आणि कंटेनरच्या मागील बाजूस धडकली आणि स्फोट झाला. लोकांच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होत आहे की, कार रस्त्यावरून खाली येऊन कंटेनरमध्ये घुसली कशी? समोरून कोणते वाहन किंवा प्राणी येत होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.