शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

करणीच्या संशयातून एकाचा खून, महिला गंभीर जखमी, हल्लेखोर स्वत:हून पोलिस ठाण्यात

By उद्धव गोडसे | Published: May 16, 2023 11:34 PM

टेंबलाईनाका उड्डाणपूल चौकातील प्रकार, घटनेने खळबळ

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: आपल्या कुटुंबावर करणी करीत असल्याच्या संशयातून निखिल रवींद्र गवळी (वय २२, रा. टेंबलाईनाका उड्डाणपूल, कोल्हापूर) याने शेजारी राहणा-या कुटुंबावर घरात घुसून तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आझाद मकबूल मुलतानी (वय ४८) हे जागीच ठार झाले, तर त्यांची सून अफसाना आसिफ मुलतानी (वय २२, दोघे रा. टेंबलाईनाका उड्डाणपूल) गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर गवळी स्वत:हून राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.

घटनास्थळ आणि पोलिस अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रिंग कामगार आझाद मुलतानी हे त्यांची पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे यांच्यासह टेंबलाईनाका उड्डाणपूल येथील झोपडपट्टीत राहत होते. त्यांच्याच घराच्या शेजारी राहणारा निखिल गवळी हा टेम्पोचालक आहे. मद्यपी आणि गांजाचा व्यसनी निखिल हा नेहमी गल्लीतील लोकांना शिवीगाळ करतो. त्यामुळे तो गल्लीत येताच लोक घराचे दरवाजे बंद करून घेतात. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरात आला. काही वेळाने बाहेर येऊन त्याने आझाद मुलतानी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे पाहिले. त्यानंतर घरातील तलवार घेऊन त्याने जेवणाच्या ताटावर बसलेले आझाद यांच्यावर पाठीमागून हल्ला चढवला. मानेवर, पाठीत, छातीवर, पायावर आठ ते दहा वार केले. यावेळी सास-यांना वाचवण्यासाठी आलेली सून अफसाना गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर हल्लेखोर निखिल रक्ताने माखलेली तलवार घेऊन पळाला. अंधारात तलवार टाकून तो राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. शेजारचे कुटुंब आपल्यावर करणी करीत असल्याच्या संशयातून हल्ला केल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. दरम्यान, आझाद मकबूल यांच्या भाच्यांनी दोन्ही जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच आझाद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर अफसाना यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.

हल्लेखोराची परिसरात दहशत

हल्लेखोर निखिल याला गांजाचे व्यसन आहे. तो नेहमी गल्लीतील लोकांनी शिवीगाळ करतो. किरकोळ कारणांवरून वाद घालतो. यामुळे परिसरात त्याची दहशत होती, अशी माहिती शेजारच्या महिलांनी दिली. घटनेनंतर हल्लेखोराचे आई, वडील आणि बहीण घाबरून घरातून निघून गेले. परिसरात प्रचंड तणावाची स्थिती होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर