गर्लफ्रेन्डला भेटण्याच्या नादात एक लाख रूपये बक्षीस असलेला गुन्हेगार विक्की सोनी पकडला गेलाय. मंगळवारी रात्री गर्लफ्रेन्डला घरी सोडून जात असलेल्या विक्की सोनीचा कानपूरच्या पनकी एसटीएफसोबत सामना झाला. एसटीएफ आणि विक्की यांच्यात गोळीबार झाला. एसटीएफचा घेराव बघून विक्की पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अशात तो नाल्यात जाऊन पडला. तो गंभीर जखमी झाला. अशात त्याला एसटीएफने ताब्यात घेतलं.
एसटीएफने विक्कीकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस ताब्यात घेतले. विक्की सोनी हा अट्टल गुन्हेगार आहे. तो पोलिसांना चकमा देऊन ३ ऑक्टोबर २०१९ ला कोर्टात हजेरी दरम्यान पळून गेला होता. तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता. एसटीएफला सर्विलांसच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, विक्की सोनी पनकीच्या शताब्दी नगरमध्ये आहे. पोलिसांना वेढा दिला आणि एसटीएफने फायरिंग सुरू केली. संधी पाहून विक्कीचे दोन्ही साथीदार फरार झाले. (हे पण वाचा : टीव्हीवर मालिका बघत बसलेल्या सासूने केला नाही स्वयंपाक, सूनेने थेट पोलिसांनाच बोलवलं घरी!)
कोण आहे विक्की सोनी?
विक्की सोनीवर हत्येचा, हत्येच्या प्रयत्नाचा, लूटमार, खंडणी अशा केसेस दाखल आहेत. विक्कीने २९ ऑक्टोबर २०१५ ला एका हॉटेलमध्ये रोहित भदौरियाची हत्या केली होती. रोहित भदौरिया हत्याप्रकरण फार जास्त चर्चेत होतं. या हत्याकांडात विक्कीसोबत रामजी मिश्रा आणि रोहित बहेलिया याला तुरूंगात पाठवण्यात आलं होतं.
वापरत नव्हता मोबाइल
बदमाश विक्की सोनी मोबाइलचा फार कमी वापर करत होता. इतकंच नाही तर तो त्याच्याजवळ मोबाइल ठेवतही नव्हता. जेव्हा त्याला कुणासोबत बोलण्याची गरज पडत होती. तेव्हा तो रस्त्यातील कुणाचाही मोबाइल घेऊन त्यावरून बोलत होता. त्यामुळे एसटीएफ त्याचं लोकेशन स्ट्रेस करू शकत नव्हते. त्यांना हेही कळत नव्हतं की, तो शहरात कधी आला आणि कधी शहरातून गायब झाला. (हे पण वाचा : एक्स आर्मी ऑफिसर ६ महिलांना गुलाम बनवून करत होता त्यांचं शोषण; आरोपीला अटक...)
गर्लफ्रेन्डला भेटायला येत होता विक्की
एसटीएफला समजलं होतं की, विक्की सोनीची एक गर्लफ्रेन्ड आहे. तिला भेटण्यासाठी तो नेहमी येत होता. एसटीएफने कशाप्रकारे मुलीचा नंबर घेऊन सर्विलांस आणि लिसनिंगवर टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की मंगळवारी गर्लफ्रेन्डसोबत फिरत होता. सायंकाळी त्याने गर्लफ्रेन्ड घरी सोडलं आणि साथीदारांसोबत पनकीमध्ये वसूली करण्यासाठी गेला. तेव्हाच त्याला पकडण्यात आलं.