नेरळ : नेरळ बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा घटनांमुळे नेरळ बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. नेरळ पोलीस हद्दीत ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नेरळ बाजारपेठेतील लस्सी गल्लीत मुकूड बॅगड दुकानासमोर फिर्यादी (रा. बेकरेवाडी) हे नेरळ बाजार पेठेतील लस्सी गल्लीतील मुकूड बॅगड या दुकानाच्या समोर कपडे घेण्याकरिता गेले असता व दुकानाच्या समोर गर्दी असल्याने बाहेर थांबले. यावेळी कोणीतरी फिर्यादी यांच्या हातातील पिशवीला खालून ब्लेड मारून एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली.याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह राहुल मुनेश्वर हे करीत आहेत. पैसे चोरणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून पोलीस या महिलांचा शोध कशा प्रकारे लावतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पिशवीला ब्लेड लावून चोरले एक लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 2:28 AM