ठाणे : काही दिवसांपूर्वीच गुन्हे अन्वेषण शाखेने ११० किलो गांजा प्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, विकास चौबे याचेही नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने भिवंडी येथील काल्हेर भागातून ३५० किलो वजनाचा ३५ लाख रुपये किमतीचा गांजा केले आहे. या प्रकरणी विकास चौबे याला अटक केली आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचने काही दिवसांपूर्वी काल्हेर येथे सापळा रचून गांजाची साठवणूक करणार्या अंबालाल जाट (३०) याला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या टेम्पोमधून ११० किलो गांजा जप्त केला होता. अंबादासची चौकशी केली असता, त्याच्या चौकशीत विकास चौबे याचे नाव समोर आले. पोलिसांनी काल्हेर येथून चौबे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गोदामातून ३५० किलो गांजा जप्त केला आहे.
एकूण ३५ लाख 3 हजार ३५० रुपये किमतीचा हा गांजा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात आतापर्यंत ४६० किलो गांजा जप्त करण्यात आला असून यामध्ये आंतरराज्य टोळी यात सक्र ीय असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.