शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

एकतर्फी प्रेमातून त्याने महिलेला एका दिवसांत केले 511 कॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 4:02 PM

बडोद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला एका प्रेमवीराने चक्क ५११ कॉल केले आहेत.

ठळक मुद्दे ऑक्टोबर 2018 मध्ये व्यवसायाने डिस्को जॉकी असलेल्या एतलची भेट पीडित महिलेसोबत झाली होती. डीजे असल्यामुळे कुठली पार्टी असेल तर सांगा असे सांगून त्याने पीडित महिलेशी जवळीक वाढविण्याचा बहाणा शोधला होता.पोलिसांनी एतलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे.

बडोदा - अनोळखी फोनवरून येणारे कॉल्स हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असते. त्यातच एकतर्फी प्रेम करणारे काही प्रेमवीर महिला आणि मुलींना अशा अनोळखी नंबरवरून फोन करून त्रास देत असतात. मात्र बडोद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला एका प्रेमवीराने चक्क ५११ कॉल केले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एतल पिल्लई असं या प्रेमवीराचे नाव आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये व्यवसायाने डिस्को जॉकी असलेल्या एतलची भेट पीडित महिलेसोबत झाली होती. एतलने महिलेला त्याचा नंबर देऊन तिच्याकडून तिचा नंबर मागितला होता. डीजे असल्यामुळे कुठली पार्टी असेल तर सांगा असे सांगून त्याने पीडित महिलेशी जवळीक वाढविण्याचा बहाणा शोधला होता. महिलेकडून तिचा नंबर मिळाल्यानंतर तो तिला वारंवार कॉल करून त्रास देऊ लागला. तिच्याशी प्रेमसंबंधासाठी तो दबाव आणू लागला. महिला विवाहित असल्याने तिने त्याला नकार दिला. हे प्रकरण इतक्यावरच न थांबलं नाही. एतलने तिला धमकवायला सुरुवात केली. तिचा पती ऑफिसला निघून गेल्यानंतर एतल तिच्या घराबाहेर येऊन तिला त्रास देऊ लागला. महिलेने पतीला विश्वासात घेऊन त्याच्यासह एतलला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर एतलने तिला नवरा आणि मुलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. महिला धमक्यांनाही भीक घालत नाही असं लक्षात आल्यावर त्याने 23 मार्च रोजी तिच्या फोनवर सलग 511 वेळा कॉल केले. त्यावेळी मात्र महिलेचा संयम सुटला आणि तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी एतलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMobileमोबाइल