शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

लातूरमध्ये खोटा धनादेश दिल्या प्रकरणी एकास सहा महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:02 PM

खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़ 

लातूर : खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़ 

लातूर शहरातील इस्माईल दस्तगीर पठाण (रा़ जिनत सोसायटी)यांनी फिर्यादी नसीमाबेगम इब्राहिमसाब शेख (रा़ काझी मोहल्ला) यांच्याकडून हात उसने तीन लाख रूपये सहा महिन्यांच्या मुदतीसाठी घेतले होते़ मुदत संपल्यावर नसीमाबेगम यांनी पैशाची मागणी केली असता इस्माईल पठाण यांनी लातूर अर्बन को- आॅप बँकेचा धनादेश फियादीच्या नावे दिला़ मात्र, सदरील खात्यात रक्कम नसल्याने चेक वटला नाही़ त्यामुळे खोटा धनादेश देऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर  नसीमाबेगम शेख यांनी अ‍ॅड़ एऩ जी़ पटेल यांच्यामार्फत नोटीस दिली़.

या नोटिसीला पठाण यांनी खोटे उत्तर पाठविले़ त्यामुळे पठाण यांच्यावर न्यायालयात फौजदारी दाखल करण्यात आली़ सदर प्रकरणात फिर्यादी व आरोपीची साक्ष,दोन्ही बाजुंच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले़ दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम़ सी़ शेख यांनी फिर्यादीचा युक्तीवाद ग्राह्य धरून इस्माईल दस्तगीर पठाण (वय ३६, रा़ झिनत सोसायटी) यांना कलम १३८ नि़ई़ अ‍ॅक्टप्रमाणे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली़ फिर्यादीस निकालाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई म्हणून धनादेशाचे तीन लाख व ६० हजार दंड द्यावा, असा आदेश दिला आहे़ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड़ एऩ जी़ पटेल यांनी काम पाहिले़ त्यांना अ‍ॅड़ अशोक कावळे यांनी सहकार्य केले़

टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजीlaturलातूर