शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

ॲानलाइन फसवणूक: महामारीत दिल्लीकरांना कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 7:16 AM

Online fraud: कोरोना महामारीत दिल्लीत लबाड लोकांनी हजारो लोकांची ऑनलाइन फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली :  कोरोना महामारीत दिल्लीत लबाड लोकांनी हजारो लोकांची ऑनलाइन फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. लबाडांनी  व्हाॅट्सॲप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर आपले फोन नंबर आणि बनावट वेबसाइट्सच्या लिंक शेअर केल्या. गरजूंनी त्या क्रमांकावर फोन करून वस्तूंसाठी आगाऊ पैसेही भरले. यात ७२ ते ७५ टक्के तक्रारी या ऑक्सिजन सिलिंडरशी संबंधित, तर २२-२३ टक्के तक्रारी रुग्णालयात खाट मिळणे, घरात आयसीयू उपचाराशी संबंधित होत्या. फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही तासांत जवळपास २५० बँक खाती सील केली गेली. ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी होत्या. ९०० पेक्षा जास्त मोबाइल क्रमांक बंद केले गेले होते. त्यात सर्वात जास्त ३५९ क्रमांक पश्चिम बंगालचे, तर राहिलेल्या ५४१ मध्ये हरयाणा, राजस्थान, आसाम, कर्नाटक, ओदिशा, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआरचे आहेत. ४०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले असून, जवळपास १०० आरोपी अटकेत आहेत.  

फसवणुकीचे नवे मार्ग... डीसीपी सायबर क्राइमने लोकांना दिलेल्या इशाऱ्यानुसार घर भाड्याने देऊ इच्छिणारे या लबाडांचे लक्ष्य असते. फसवणूक करणारा प्रॉपर्टी पोर्टलवरून अशा लोकांचे फोन नंबर घेऊन कॉल करतो. मग भाडे ॲडव्हॉन्स देण्यासाठी घरमालकाला त्याच्या फोनवर एक क्यूआर स्कॅन करायला सांगताे. तो स्कॅन केला की, पैसे लबाडाच्या खात्यात जमा होतात.  ही रक्कम ठराविक कालावधीसाठी खात्यातून कपात होते. जर कोणी आगाऊ भाडे घेण्यासाठी घाई करीत असेल तर त्यापासून सावध राहावे. 

माध्यम यूपीआयफसवणुकीवर लक्ष ठेवणे आणि धोक्याच्या जोखमीची भविष्यवाणी आणि उत्तरे याबाबत जागरूक करणाऱ्या ट्रस्टचेकरच्या अहवालात म्हटले आहे की, फसवणुकीच्या सर्वात जास्त (४१ टक्के) घटना या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून झाल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली