नागपूर - शहरातील एका बँक मॅनेजर महिलेची तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाइन मार्केटप्लसवर घरातील काही सामान विकण्यासाठी त्यांनी टाकलं होतं. मात्र, त्यांना ५ लाख १० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला. नागपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मीता विश्वास (३१) यांनी ऑनलाइन साईटवर त्यांच्या घरातील रेफ्रिजेटर आणि सोफ्याचे फोटो आणि विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा तपशील शेअर केला होता. त्यांची ही जाहिरात पाहून एका व्यक्तीचा त्यांना फोन आला, ज्या व्यक्तीने ते सामान खरेदी करण्यास इच्छुक असल्याचं कळवलं. त्यासंदर्भात दोघांचं बोलणं झाल्यानंतर पीडित महिलेकडे केवळ व्हेरीफिकेशनसाठी म्हणून ६० रुपये पाठवण्याची मागणी केली. त्यावर, महिलेनेही त्याला प्रतिसाद देत पैसे पाठवले. पण, या व्यवहारात झालेल्या फसवणुकीमुळे महिला त्रस्त झाली.
सुरुवातीला आरोपीने महिलेकडे ६० रुपये पाठवण्याची मागणी केली. महिलेने ते पैसे पाठवल्यानंतर, तिच्या बँक अकाऊंटमधून १ लाख ०१ रुपये काढण्यात आले. हे पैसे परत करण्याच्या नावाने आरोपीने महिलेच्या खात्यात ९ हजार रुपये टाकले. त्यानंतर आरोपीने महिलेच्या खात्यातील सर्वच रक्कम ५ लाख १० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी फसवणूक आणि सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही काळजी घ्यायला हवी
अशाप्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तुमच्यासोबतही हा फ्रॉड होऊ शकतो. कारण, कुठल्याही लिंकवर क्लिक केल्याशिवाय किंवा खातेधारकाच्या खात्यातून आरोपी थेटपणे पैसे काढतो. तर, ओएलएक्सवर जाहिराती टाकणाऱ्या विक्रेत्यांना विश्वासात घेऊन ही फसवणूक केली जाते. याप्रकरणातही असेच घडले. विक्रेत्याला विश्वासात घेऊन त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली.
ओएलएक्सवर वस्तू विकत किंवा घेत असताना काळजी घ्याकुठल्याही नवख्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवू नकाऑनलाइन व्यवहारात कधीही कोणाशीही ओटीपी शेअर करू नका