मुंबई - महाराष्ट्र एटीएसने काल रात्रीपासून कारवाई करत ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’ चा कार्यकर्ता वैभव राऊत आणि शिवप्रतिष्टानचा कार्यकर्ता सुधन्वा गोंधळेकर यांना नालासोपारा येथून ताब्यात घेतले. तर पुण्यातून शरद काळसकरला ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयित आरोपी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद काळसकर यांना न्यायालयात हजर केले असता १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसला ७ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून मुंबईत काही संशयास्पद कारवाई सुरु असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. केवळ गुप्त बातमीदाराकडून एटीएसच्या अधिकाऱ्यांना दहशतवादी कारवाया करणाऱ्या संशयास्पद आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळाले होते. या मोबाईल क्रमांकाच्या आधारे एटीएसच्या पोलिसांनी २ दिवस गुप्त पळत ठेवत आणि माहिती गोळा करत नालासोपारा येथे छापा टाकत ८ गावठी बॉम्ब घरात तर १२ बॉम्ब दुकानाच्या गोडाऊनमधून आणि इतर घातक सामान हस्तगत केलं. अशाप्रकारे २० बॉम्ब आणि ५० हातबॉम्ब बनवण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले. तर पुण्यात शिवप्रतिष्ठान संस्थेच्या सुधन्वा गोंधळेकरला पोलिसांकडूनअटक केली. तसेच एकूण १६ जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे, सातारा, मुंबई, सोलापूर आणि नालासोपारा या पाच ठिकाणी घातपात होणार होता जो उधळण्यात एटीएसला यश आले आहे. अटक तीन आरोपी सतत एकमेकांच्या संपर्कात होते असून त्यांच्या मोबाईलचा आणि सोशल मीडियावरील हालचाली पुढील तपासात एटीएस तपासणार आहे. त्यातून ते अजून कोणाच्या संपर्कात होते हि माहिती मिळण्यास मदत होईल असे सूत्रांनी माहिती दिली.
केवळ मोबाईल क्रमांकावरून केली एटीएसने मोठी कारवाई; तिघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 7:39 PM