भिवंडी - तालुक्यातील पडघा नजीकच्या करंजोटी या गावातील आकाश नारायण शेलार या 21 वर्षीय तरुणांची गळा आवळून व वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली असून गावा बाहेरील एका शेतात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. नारायण शेलार यांचा आकाश हा एकुलता एक मुलगा असून तो खडवली येथील महाविद्यालयात 14 वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याचबरोबर वडिलांसोबत जिंदाल कंपनी येथे रोजंदारी कामगार म्हणून काम देखील करीत होता. या हत्येची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला असून पोलिसांनी हत्ये प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली याचा उलगडा अजूनही होऊ न शकल्याने पोलीस हत्ये मागच्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान मृत आकाशचे वडील नारायण शेलार यांनी आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यांचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पि. जे. चौधरी हे करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या
दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक