शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आठ कर्मचाऱ्यांनीच लाटले पीएफचे पैसे; १८ कोटींच्या गैरव्यवहारात आठ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:33 AM

ईपीएफओच्या कांदिवली कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांनी बनावट खाते तयार करून रकमेवर मारला डल्ला

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (ईपीएफओ) १८ कोटी ९७ लाखांच्या गैरव्यवहारात सीबीआयने आठ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईपीएफओच्या कांदिवली कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांनी बनावट खाते तयार करून या रकमेवर डल्ला मारला. कार्यालयातील लिपिक चंदनकुमार सिन्हा हा या प्रकरणातला मास्टरमाईंड आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला होता. त्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने कोरोनाच्या २०२० ते २०२१ या काळात स्थलांतरित कामगारांच्या ८१७ खात्यांचा वापर करून बोगस दावे करत कोट्यवधी रुपये उकळले. लॉकडाऊनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड सिन्हा याला दिले आणि नंतर ते बदलले नाहीत. त्याचा व सिस्टिममधील काही त्रुटींचा त्याने उपयोग केला.पीएफमधून ५ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दुसऱ्या पडताळणीनंतरच त्याला मंजुरी दिली जाते; पण एक ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी अशी तरतूद नाही. लेखा परीक्षणातील तरतुदींबाबतही त्याला माहिती होती. त्याला अन्य व्यक्तींनी सहकार्य केले.गरजू आणि मुख्यतः बेरोजगार स्थलांतरित कामगारांकडून ५ हजार रुपये देऊन बँक खाती आणि आधार तपशील मिळवून त्यांनी हा गैरव्यवहार केला. १०-१५ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मुंबईस्थित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ खाती उघडण्यात आली. २०१४ पूर्वी उघडलेल्या पीएफ खात्यांसाठी युनिव्हर्सल अकाैंट नंबर (युएएन) काढण्याची तरतूद होती आणि पैसे काढताना तो नंबर तयार करणे अनिवार्य असे. नंतर ही सुविधा नव्हती. याचा फायदा घेण्यात आला. ईपीएफओने जुलै महिन्यात याबाबत निनावी तक्रार येताच चौकशी केली. त्यानुसार, आठही जणांना निलंबित केले. पैसे कुणाचे...नोंदणीकृत संस्थांचेफसवणुकीने काढलेले पैसे ईपीएफओच्या एका निधीतील होते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नोंदणीकृत संस्थांनी ठेवलेल्या ठेवीचे पैसे जमा केले जातात. हा पैसा मुख्यतः सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. वैयक्तिक खात्यातील पैशांची अफरातफर झालेली नाही. हे ईपीएफओचे नुकसान झाले आहे; कोणत्याही व्यक्तीचे नाही. हे बँक लुटण्यासारखेच आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी