मदुरै - तामिळनाडूच्या मदुरै येथील अमंजलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीच्या एका अधिकाऱ्यास २० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या अधिकाऱ्याने एका सरकारी डॉक्टरशी संबंधित प्रकरणात बेहिशोबी मालमत्तेचा तपास करत होता. अंकित तिवारी असं या ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने डॉक्टराकडे तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अटकेनंतर तामिळनाडूच्या लालचुचपत प्रतिबंधन विभागाच्या पोलिसांनी थेट मदुरै येथील ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. आत्तापर्यंत ईडीचे अधिकारी अनेकांच्या घरी धाड टाकत होते, मात्र आता ईडीच्या कार्यालयात धाड टाकल्याने जोरदार चर्चा होत आहे.
ईडी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी तपास करण्यासाठी येथील दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने विभागीय कार्यालयावर पोलिसांसह धाड टाकली. या पथकाने ईडीच्या संबंधित अधिकाऱ्याला अटक केली असून अंकित तिवारी असं त्याचं नाव आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत माहितीही पोलिसांकडून दिली जाईल. अंकित तिवारी एका वेगवाग कारमधून प्रवास करत होता, त्यावेळी, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. अंकित तिवारीला रंगेहाथ अटक करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मून पथकाने जाळं टाकलं होतं. स्टेट हायवेवरील एक ड्रॉप ऑफ पाईंटवर अंकित तिवारीने संबंधित प्रकरणातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणजेच २० लाख रुपये घेतले. त्याचवेळी, भ्रष्टाचार निर्मून पथकाने घटनास्थळी रेड मारली अन् ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली.