कॅबिनेट आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आज लेखी तक्रार दिल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आज करुणा यांनी आपल्या वकिलासोबत जाऊन पोलीस आयुक्तालयात पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मुलांना भेटण्यास दिले नाही तर २० फेब्रुवारीला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा करुणा यांनी दिला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत करुणा यांनी म्हटले आहे की, माझ्या नवऱ्याविरोधात भादंवि कलम ३७६, ३७७, ४२०, ४७१, ३२४, ५०६ (२), घरगुती हिंसाचार कायदा कलम १८, १९ आणि आयटी ऍक्ट दाम्पत्य अधिकार कलम ९ अन्वये तक्रार केली आहे. तसेच तक्रारीत करुणा यांनी म्हटले आहे, माझ्या दोन मुलांना धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या बंगल्यात डांबून ठेवले आहे आणि त्यांना भेटू देत नाही. इतकेच नव्हे तर फोनवर बोलू देखील देत नाही. २४ जानेवारीला चित्रकूट बंगल्यावर मुलांना भेटायला चित्रकूट बंगल्यावर गेले तर धनंजय मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांनी बोलावले आणि मला मुलांना भेटण्यास मज्जाव केला.
धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
तसेच धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या मंत्रिपदावरून हटवा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. कारण माझी लहान मुलगी १४ वर्षाची आहे आणि बंगल्यावर कोणीही काळजी घेणारं नाही, तसेच मुंडे यांचे चाल चलन ठीक नाही आहे. मुंडे लफडेबाज असून दारू पितात आणि नशेत अश्लील चाळे करतात. माझ्याविरोधात मुलांना भडकवतात. त्यामुळे माझ्या मुलांना काहीही झालं तर त्याला धनंजय मुंडे जबाबदार असतील आणि मला माझ्या मुलांना भेटू द्यावे नाहीतर मी २० फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसणार आहे. मला चित्रकूट बंगल्यासमोर वा मंत्रालयासमोर किंवा आझाद मैदनावर आमरण उपोषणासाठी परवानगी दिली जावी, तसेच मुंडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी.