शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

५०० हून अधिक कंडोम जप्त; मेघालयमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भाजप नेत्याला यूपी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 2:16 PM

Sex Racket : त्यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकल्यानंतर बर्नार्ड फरार झाल्याचे सांगण्यात आले.

मेघालयमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप असलेले भाजप नेते बर्नार्ड एन मारक याला अटक करण्यात आली आहे. बर्नार्ड एन मारक यांना उत्तर प्रदेशातील हापूर येथून अटक करण्यात आली आहे. आता मेघालयातून एक पोलीस पथक येत आहे, ते बर्नार्ड यांना आपल्यासोबत घेऊन जाईल.

त्यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकल्यानंतर बर्नार्ड फरार झाल्याचे सांगण्यात आले. वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितले की, बर्नार्डला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आता एक टीम तिथे जाईल आणि बर्नार्डला घेऊन येईल. त्याचवेळी हापूरचे एसपी दीपक भुकर यांनीही बर्नार्डला मेघालय पोलिसांच्या टीमकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले. 

हापूरच्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिलखुवा पोलिस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओपी) टीमने बर्नार्डला गाझियाबाद सीमेजवळील टोल प्लाझा येथून पकडले. मेघालय पोलिसांनी बर्नार्डच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्याचे त्या टीमला माहीत होते. बर्नार्डविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. या छाप्यात सुमारे ४०० दारूच्या बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. या छाप्यात 27 वाहने, 8 दुचाकी आणि क्रॉसबो आणि बाणही जप्त करण्यात आले आहेत.वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) विवेकानंद सिंग यांनी तेव्हा सांगितले होते की, एका गुप्त माहितीच्या आधारे राजकारणी बनलेल्या मारक यांच्या मालकीच्या रिम्पू बागान या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. यावेळी आम्ही चार मुले आणि दोन मुलींसह सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली. मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिंपू बागानमधील केबिनसारख्या खोलीत ही मुले वेश्याव्यवसायासाठी बंद करून ठेवल्याचा आरोप आहे.

फार्म हाऊसमध्ये एकूण 30 लहान खोल्यात्या फार्म हाऊसमध्ये एकूण 30 लहान खोल्या असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, हे तेच ठिकाण आहे जिथे एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवेकानंद सिंग म्हणाले की, एका आठवड्यात अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे आणि कलम ३६६अ, ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटBJPभाजपाPoliceपोलिसraidधाडArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश