नोएडा येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. जिथे एका चार वर्षाच्या निष्पाप मुलीने आपल्या 8 महिन्यांच्या लहान भावाला पाणी म्हणून डिझेल दिले. त्यामुळे निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना नोएडातील सेक्टर 63 भागातील छिजारसी गावातील आहे.पीडितेचे कुटुंब मूळचे हरदोई येथील आहे. मात्र चिजारसी गावात प्रदीर्घ काळापासून वास्तव्य आहे. ही घटना गेल्या सोमवारची आहे. घरातील सर्व सदस्य घरी उपस्थित होते. अचानक 8 महिन्यांचा चिमुकला रडायला लागला. भावाला रडताना पाहून बहिणीने शेजारी पडलेली बाटली उचलली आणि पाणी समजून पाजले. पण तिच्याकडे पाणी नाही तर डिझेल आहे हे त्या मुलीला माहीत नव्हते.डिझेल प्यायल्याबरोबर चिमुकलला जोरजोरात रडू लागला. घरातील सर्व सदस्य चिमुकल्याकडे आले, मुलीने पाण्याऐवजी डिझेल दिल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तात्काळ चिमुकल्याला रुग्णालयात नेले, मात्र तीन दिवसांच्या उपचारानंतर मुलाचा मृत्यू झाला. माहिती देताना कोतवाली सेक्टर 63 म्हणाले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. चौकशीत असे आढळून आले आहे की, 4 वर्षांच्या बहिणीने बाटलीत ठेवलेले डिझेल पाणी समजून भावाला दिले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
वेदनादायी! 4 वर्षाच्या बहिणीने 8 महिन्यांच्या भावाला पाणी समजून दिले डिझेल, चिमुकल्याचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 9:42 PM