शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:09 PM

HoneyTrap Case : गणेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो सध्या पुण्यात तैनात होता. नुकतीच त्यांची जोधपूरहून पुण्यात बदली झाली.

लष्करात पुन्हा एकदा हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती एका पाकिस्तानी तरुणीला जवान देत होता. दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) याची माहिती मिळताच आरोपी जवानाला अटक करण्यात आली.आरोपी जवान बिहारचा रहिवासी असून तो रजेवर घरी गेला होता, तेव्हाच त्याला एटीएसने अटक केली. आरोपी जवानाने चौकशीदरम्यान पाकिस्तानी महिलेसोबत माहिती शेअर केल्याची कबुलीही दिली आहे. गणेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो सध्या पुण्यात तैनात होता. नुकतीच त्यांची जोधपूरहून पुण्यात बदली झाली. गणेशवर भारतीय लष्कराशी संबंधित कागदपत्रे एका पाकिस्तानी महिलेसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.फेसबुकवर मैत्रीमिळालेल्या माहितीनुसार, गणेश फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला. हळूहळू दोघेही बोलू लागले आणि त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही फोन नंबरवरून एकमेकांशी बोलत असत. महिलेने जवानाला अशा पद्धतीने गोवले की गणेशने लष्कराशी संबंधित कागदपत्रे त्या महिलेसोबत शेअर करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी महिलेने स्वत:ला भारतीय संरक्षणाची डॉक्टर असल्याचे सांगितले होते.आरोपी जवान असा पकडला गेलाकाही जवान भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंटला लीक करत असल्याचा संशय अनेक दिवसांपासून गुप्तचरांना होता. यानंतर गुप्तचरांनी तपास सुरू केला असता गणेशकडे संशयाची सुई येऊन थांबली. गणेश सुट्टीवर घरी गेला होता, तेथून त्याला एटीएसच्या पथकाने अटक केली.गणेशला पाटणा येथील खगौल पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशीदरम्यान गणेशने पाकिस्तानी महिलेसोबत माहिती शेअर केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रायव्हसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र, याप्रकरणी लष्कराचे अधिकारी अधिकृतपणे माहिती देण्यास टाळत आहेत.यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेतलष्कराचा जवान पाकिस्तानी एजंटच्या जाळ्यात अडकून महत्त्वाची माहिती शेअर करण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही एका पाकिस्तानी महिलेने दानापूर उपक्षेत्रात संतोष नावाच्या सैनिकाला सापळा रचून लष्कराशी संबंधित कागदपत्रे मिळवली होती. त्यातही जवानाला अटक करण्यात आली होती.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपSoldierसैनिकPuneपुणेBiharबिहारPoliceपोलिसPakistanपाकिस्तानFacebookफेसबुकAnti Terrorist Squadएटीएस