नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणिपाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारतानेपाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या नाकी दम आला आहे. त्यामुळे इम्रान खान याच्या पाक सरकारकडून शांततेसाठी चर्चेकरीत भारताला बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यावर भारताने देखील चर्चा आणि दहशतवाद एकत्र होणार हे ठामपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान दहशतवाद संपवण्याबाबत गंभीर असल्यास त्यांनी दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे.
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देत दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तात्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.