शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 1:38 PM

Tiktok Star Suicide : एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पेशावर - तरुणाईमध्ये टिकटॉकची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. अल्पावधीत अनेकांना टिकटॉकने स्टार केलं आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहजाद अहमद असं या 20 वर्षीय टिकटॉक स्टारचं नाव असून पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ही भयंकर घटना घडली. शहजादने आपली फॅन असलेल्या एका मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आयुष्य संपवलं आहे. 

द एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, शहजाद टिकटॉकवर अत्यंत लोकप्रिय होता. त्याचे टिकटॉकवर तब्बल दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. याआधीदेखील त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले होते. शहजादचा भाऊ सज्जातने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहजादचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, तिच्या वडिलांनी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे शहजादला मोठा धक्का बसला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली आहे.

शहजादच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी एका मुलीने फॅन असल्याचं सांगत शहजादसोबत संपर्क साधला होता. कालांतराने दोघांमध्ये पुढे मैत्री झाली. मुलगी अल्पवयीन आहे. तिचे वय 16 वर्ष असून ती शालेय शिक्षण घेत आहे. शहजादने मुलीला प्रेमाची मागणीदेखील घातली होती. मात्र, मुलीने नकार दिला आणि यापुढे संपर्क न साधण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

ओडिशा विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेत घडलेल्या या धक्कादायक घटनेने गोंधळ उडाला. सुभाष चंद्र पाणिग्रही (Subhash Chandra Panigrahi) असं या भाजपा आमदाराचं नाव असून ते देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत धान्य खरेदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

भाजपा आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकावून घेतलं. पाणिग्रही यांनी "सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी धान्य खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही" असा गंभीर आरोप केला आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPakistanपाकिस्तानDeathमृत्यू