पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर एक पाकिस्तानी नागरिक भारतीय हद्दीत घुसला. हा पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेच्या एक किलोमीटरच्या आत आला. हरुवाल गावातल्या पोल्ट्री फार्ममध्ये स्थानिकांना दिसल्याची माहिती बीएसएफच्या अधिका ऱ्यांना देण्यात आली. त्याचवेळी बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दीड ते एकाच्या सुमारास हा नागरिकाला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव शिबाज अहमद पुत्र मोहम्मद इक्बाल, रा. गाव बुरेवाली, पोस्ट ऑफिस औरंगाबाद, तहसील नरोवाल असे सांगितले आहे. हा नागरिक कोणत्या मार्गाने भारतात आला याचा तपास केला जात आहे. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून कोणताही माल जप्त करण्यात आला नाही.ड्रोन चार सेकंदासाठी आलाबीओपीच्या मॅटला पोस्टवर गुरुवारी संध्याकाळी 4.47 वाजता पाकिस्तानच्या बाजूने ड्रोन आला, चार सेकंद थांबाल्यानंतर ते परत पाकिस्तानात गेले. बीएसएफचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पाकिस्तानी नागरिकास पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय सीमेवर करत होता टेहळणी
By पूनम अपराज | Published: February 07, 2021 9:22 PM
Crime News : आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
ठळक मुद्दे प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव शिबाज अहमद पुत्र मोहम्मद इक्बाल, रा. गाव बुरेवाली, पोस्ट ऑफिस औरंगाबाद, तहसील नरोवाल असे सांगितले आहे.