शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पाकच्या आदिल शेखनं हरशिमरनला केलं ब्लॅकमेल; ३६३ कोटींचे हेरॉइन प्रकरणी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 5:55 AM

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.

आशिष सिंगमुंबई - गेल्या वर्षी जेएनपीटी बंदरात आलेल्या ३६३ कोटी रुपये किमतीचा हेरॉइनचा साठा ताब्यात घेण्यास आयातदार हरशिमरन सेठी याने नकार दिल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचा ड्रग सप्लायर आदिल शेख आणि जर्मनीतील मोनू सिंह ऊर्फ मनी हे तो साठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हरशिमरनला ब्लॅकमेल करीत होते, असे तपासात उघडकीस आले आहे. 

हरशिमरनने चौकशीत सांगितल्यानुसार व्हिएतनाम, ग्रीस, चीन आणि पाकिस्तान येथून तो विविध प्रकारच्या मालाची आयात करतो. याचदरम्यान त्याची अटारी सीमेवर आदिल शेखशी ओळख झाली. आदिल हरशिमरनला पाकिस्तानातून ड्रायफ्रूटचा पुरवठा करायचा. दोघांमध्ये उधारीवर व्यवसाय चालायचा. मात्र कालांतराने हरशिमरनचे व्यवसायात नुकसान झाल्याने तो आदिलचे १ कोटी ३० लाख रुपये देणे लागत होता. रकमेच्या वसुलीसाठी हरशिमरन आणि त्याच्या कुटुंबीयांना आयएसआयमार्फत धमकीचे फोन येऊ लागले. आदिलच्या हस्तकांकरवी खात्मा केला जाईल, असे त्याला धमकावले जात होते. घाबरलेला हरशिमरन २०२० साली गुजरातमधील गांधीग्राम येथे राहावयास गेला. जयपूरमध्ये व्यवसायात जमू लागलेला असतानाच हरशिमरनला आदिल शेखचा फोन आला. उधारीचे १ कोटी ३० लाख रुपये माफ केल्याचे सांगत अफगाणिस्तानातून आलेला संगमरवरी फरशांचा साठा ताब्यात घेऊन दिल्लीला पोहोचवण्याची गळ आदिलने हरशिमरनला घातली. ती मान्य करून हरशिमरन दिल्लीतील घरी परतला. 

काही महिन्यानंतर लुधियानातून चारजण हरशिमरनला भेटायला आले. याच चौघांवर ड्रग तस्कर मोनू सिंहने हेरॉइनचा साठा दिल्लीहून पंजाबमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली होती. या चौघांनी  हरशिमरनला २१ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यातील २० लाख रुपये अफगाणिस्तानातील हा कंटेनर चालान बनवून जेएनपीटी बंदरातून ताब्यात घेण्याचे तसेच एक लाख रुपये मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या वाहतुकीसाठी होते. कंटेनर दिल्लीत पोहोचल्यावर तो पंजाबला नेण्याची त्यांची योजना होती. चौघांना नंतर पंजाब पोलिसांनी अटक केली. 

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.  राठोडने दुसरा एजंट सागर कांबळे याला गाठले. तपशिलात गेल्यावर हरशिमरनच्या लक्षात आले की बंदरात आलेला कंटेनर अफगाणिस्तानातून नसून पाकिस्तानातून पाठवण्यात आला आहे. त्यावरील २८० टक्के ड्युटी भरल्यावरच तो आपल्या ताब्यात दिला जाईल. त्यामुळे हरशिमरनने तो ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकाराने संतापलेल्या आदिल शेख आणि मोनू सिंह यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. हा कंटेनर ताब्यात घेऊन दिल्लीपर्यंत पोहोचवला नाही तर त्या कंटेनरमध्ये हेरॉइन असून, तो हरशिमरन हाच त्याचा आयातदार आहे आणि तो दिल्ली तसेच पंजाबमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती तपास यंत्रणांना देऊ, असा दम ते देत राहिले. यादरम्याम सात महिने कंटेनर बंदरातच पडून राहिला. काही दिवसांनी त्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आणि छापासत्र घडले.