हितेन नाईक
पालघर/कासा - गडचिंचले येथील साधूंच्या निर्घृण हत्येप्रकरणी एक सहाय्यक उपनिरीक्षकासह दोन कॉन्स्टेबल अशा तीन कर्मचाऱ्यांची कामात हयगय केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले. तर अन्य 35 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. परंतु ह्या प्रकरणात "स्लॅक सुपर व्हिजन"चा ठपका फक्त दुय्यम कर्मचाऱ्यांवर ठेवून त्यांना निलंबित केल्याने पोलीस विभागात नाराजी आहे.
palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई
उल्हासनगरात कोरोना संसर्गित पोलिसाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण, रुग्णाची संख्या सात
गुजरातकडे निघालेल्या दोन साधू आणि वाहन चालक यांची हत्या चोराच्या अफवेमुळे जमावाकडून करण्यात आली होती. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे या दोन अधिकारी यांच्यावर हत्या रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. या हत्याकांडामागे सहभागी असलेल्या सुमारे 250 ते 300 आरोपी पैकी पोलिसांनी आतापर्यंत 110 आरोपींना पकडले असून अन्य आरोपी फरार झाल्याने त्यांना पकडण्यात अजूनही गुन्हा अन्वेषण विभागाला यश आलेले नाही. आरोपी जंगलात लपल्याच्या शंकेतून त्यांचा ड्रोनच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत. मात्र, 13 दिवस उलटून गेल्यानंतर ही त्यांच्या हाती विशेष काही पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा तपास केंद्र व राज्य शासनाच्या हस्तक्षेपाच्या कैचीत तर सापडला नाही ना? अशी ही शंका ह्या निमित्ताने जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक रवी साळुंखे, पोलीस हवालदार नरेश धोडी, आणि संतोष मुकणे या तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर 35 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक यांनी बदल्या केल्या आहेत.