शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 6:11 AM

Bihar : ही घटना गया शहरातील वझीरगंज भागात घडली. तिचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

गया (बिहार) : प्रेम प्रकरणातील दलित व्यक्तिची कानउघडणी तर करण्यात आली; परंतु धक्कादायक म्हणजे पंचायत बोलावून फरशीवर करण्यात आलेली थुंकी त्याला चाटण्यास व लघवीही पिण्यास भाग पाडण्यात आले. ही घटना गया शहरातील वझीरगंज भागात घडली. तिचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. व्हिडिओत ही व्यक्ती फरशीवर गुडघे टेकून थुंकी चाटताना दिसतो. अनेक जण फरशीवर थुंकले व प्रेम केल्याची शिक्षा म्हणून त्या थुंकी त्याने चाटल्या. थुंकी चाटल्यानंतर त्याला लघवीही पिण्यास भाग पाडले गेले.या दलित व्यक्तिने त्याच्या प्रेम प्रकरणाची कबुली दिल्यावर पंचायतने ही कारवाई केली. नुकतीच ही व्यक्ती महिलेसोबत पळून गेली होती. महिलेच्या कुटुंबाने त्या दोघांना पकडले व दलित व्यक्तिला पंचायतीत आणले. पंचायतचे सदस्य आणि सरपंचाच्यासमोर पीडित व्यक्तिला अमानवी छळाला तोंड द्यावे लागले. समाज माध्यमांवर व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. 

या छळाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल-आदित्य कुमार, गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार