शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

‘टॉर्चर’चा पंधरवाडा; दागिने लुटले, महिलेचे सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न!

By प्रदीप भाकरे | Published: June 11, 2023 3:19 PM

महिलेला बेदम मारहाण : नाशिकहून कसेबसे गाठले अमरावती, मुलांना मारण्याची धमकी

अमरावती: बचत गटाचे काम करणाऱ्या एका महिलेला बळजबरीने शहराबाहेर नेऊन तब्बल १५ दिवस तिचा अनन्वित छळ करण्यात आला. त्या काळात तिचे मंगळसूत्र व अंगठी जबरदस्तीने हिसकवण्यात आली. तिला शिवीगाळ करून बेदम मारहाण देखील करण्यात आली. सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान तो झोपला असताना तिने नाशिकहून पळ काढला. ती अमरावतीत पोहोचल्यानंतर ती छळमालिका थांबली. तिने तत्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

 २२ मे ते ६ जून या कालावधीत तो प्रसंग घडला. याप्रकरणी, पिडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी १० जून रोजी पहाटे २.५६ मिनिटांनी आरोपी सागर चंदूमल रोढा (३४, रामपुरी कॅम्प) याच्याविरूध्द जबरी चोरी, विनयभंग, मारहाण, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीने तिला अकोला, धुळे, उल्हासनगर, नालासोपारा, अहमदाबाद अशा ठिकाणी जबरदस्तीने ठेवले. अखेर तिने ५ जून रोजी आरोपी सागर हा झोपलेला असताना अहमदाबादमधून पळ काढला. ती नाशिकला पोहोचून ६ जून रोजी सकाळी नागपुरला पोहोचली. तर, ९ जून रोजी तिने नातेवाईकांसह फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. संपुर्ण प्रकरणाची वाच्यता केल्यास तुझ्या दोन्ही मुलांना जीवे मारेन, अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने तिच्याकडील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र व दोन ग्रॅमची अंगठी असा ६० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला.

सिमकार्ड तोडले, मोबाईलही घेतलातक्रारकर्ती महिला बचतगटाचे काम करते. तिने आरोपीचा भाऊ संदीप रोढा याला दोन लाख रुपये दिले होते. त्याने २० हजार रुपये परत केले. दरम्यान, पैसे परत करण्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला. त्यावेळी आरोपी सागर रोढा याने महिलेला फोन करून धमकावले. २२ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास आरोपीने तिला फोन करून बोलावले. तथा ऑटोमध्ये बसवून त्याने तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड तोडून फेकून दिले. तथा तिचा मोबाईल देखील हिसकावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी