झारखंड येथील बोकारोजवळच्या जंगलात एका महिलेचे धडापासून वेगळं कापलेलं शीर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. बोकारोच्या सेक्टर-१२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. बोकारोच्या सेक्टर-१२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत एकता कॉपरेटीव्हच्या नजीक असलेल्या जंगलात एका महिलेचं कापलेलं शीर आढळून आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेच्या धडाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शीर ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी धडाचा शोध सुरु केला आहे. या घटननेने परिसरात खळबळ माजली आहे. बोकारो येथील सेक्टर-१२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत एकता को-ऑपरेटिव्ह नजीक असलेल्या जंगलातून एका महिलेचे छिन्नविछिन्न शीर सापडले. या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. छिन्नविछिन्न शीर ताब्यात घेऊन पोलीस महिलेचे धड शोधत असल्याची माहिती पोलीस स्टेशन प्रभारींनी दिली आहे.
प्राथमिक तपासात महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हे शीर जंगलात फेकले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस स्टेशन प्रभारी जय गोविंद गुप्ता यांनी सांगितले की, पुरावे लपवण्यासाठी आणि येथे डोके टाकण्यासाठी हे प्रकरण इतरत्र खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मृतदेहाजवळ एक पिशवीही सापडली आहे. या पिशवीत खून झालेल्या महिलेचे शीर येथे आणले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेची हत्या करून पुरावा लपवण्याच्या उद्देशाने प्रथमदर्शनी डोके येथे फेकले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेहाजवळ एक पिशवीही सापडली आहे. या पिशवीत खून झालेल्या महिलेचे शिर येथे आणले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी सतानपूर पंचायतीचे पंचायत समिती सदस्याचे प्रतिनिधी उत्तम भट्टाचार्य यांनी सेक्टर-12 पोलीस स्टेशनला रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या झुडपात महिलेचे धड नसलेले शिर असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सेक्टर-१२ पोलीस घटनास्थळी पोहोचले. आज सकाळी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. घटनास्थळावरुन एक बॅगही जप्त केली आहे. पुरावे लपवता यावेत यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत शीर येथे फेकून दिल्याचे दिसून येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांना तसेच जवळच्या जिल्ह्य़ांनाही माहिती देण्यात आली आहे. जेणेकरुन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी बेपत्ता महिला असल्यास त्याची माहिती मिळू शकेल. महिलेची ओळख पटवणे हे मोठे आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले