ठळक मुद्देया प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे .
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या गणेशदेवल नगरमध्ये ६ ते ७ महिन्याचे नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शिमला गल्ली नंबर ३ या ठिकाणी एका बंद असलेल्या खोलीच्या बाहेर हे अर्भक कोणीतरी टाकून गेले होते. सदर प्रकाराची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले व भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता ते आधीच मृत झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे . या घटनेने परिसरात अर्भकाच्या अनोळखी पालकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.