पाटणा : बिहारमधील मधेपुराचे माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष (जप) राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मला अटक करण्यात आली असून त्यांना पाटण्यातील गांधी मैदान पोलिस ठाण्यात आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अलीकडे पप्पू यादव यांनी एका जागेवर दोन डझनहून अधिक रुग्णवाहिकांचा वापर न करता ठेवल्याची माहिती उघड झाली होती. सर्व रुग्णवाहिका सारण येथील खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या निधीतून खरेदी करण्यात आल्या. याप्रकरणी दोन एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. अलीकडच्या दिवसांमध्ये, माजी खासदाराविरोधात रुग्णालयात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पप्पू यादव यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, 'कोरोना काळात जीव वाचविण्यासाठी आपला जीव तळहातावर ठेवणं हा गुन्हा आहे, तर हो मी गुन्हेगार आहे. पंतप्रधान साहेब, मुख्यमंत्री साहेब फाशी द्या किंवा तुरुंगात पाठवा. मी झुकणार नाही, मी थांबणार नाही, मी लोकांना वाचवीन. मी अप्रामाणिक लोकांना उघडकीस आणेल.
यानंतर शनिवारी पप्पू यादव ड्रायव्हर्सच्या संपूर्ण टीमसह मीडियासमोर आले. त्यांनी दावा केला की, त्याच्याकडे ४० चालक आहेत, ही सर्व नावे लिहून सरकारला पाठविली जातील. असे म्हणता येईल की, भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी पप्पू यादव यांना ड्रायव्हर मिळवून सर्व रुग्णवाहिका चालवण्याचे आव्हान केले. त्याला उत्तर म्हणून पप्पू यादव आपल्या संपूर्ण टीमसह पोहोचले आणि दावा केला की या ४० वाहनचालकांकडून रुग्णवाहिका चालवून घेण्यास तयार आहेत.