Parambir Singh : परमबीर यांना दणका; सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणीस नकार; हायकोर्टात जाण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:37 PM2021-03-24T13:37:14+5:302021-03-24T13:38:17+5:30
supreme court denies hearing on parambir singh plea : परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यायिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न देता परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी'अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. (supreme court denies hearing on parambir singh plea)
परमबीर सिंह यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली. तसेच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.तसेच दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय. सिंग यांच्यावतीने अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
former Mumbai Police chief Param Bir Singh withdraws the plea from Supreme Court & says he will approach the Bombay High Court
— ANI (@ANI) March 24, 2021
"Liberty to approach the High Court granted," Supreme Court says in it's order.
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना हायकोर्टात याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर सिंग हे आजच हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.