कल्याण - हत्येच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी बाळाराम म्हस्कर याला 3 जुलै रोजी 28 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी त्याने पुन्हा कारागृहात परतणे आवश्यक होते. मात्र, म्हस्कर या संधीचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात फरार बाळारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
कल्याण शीळ रोड काटई गाव येथील शांतीनगर बंगला येथे राहणारा बाळाराम याला हत्येप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बाळारामची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता.याच दरम्यान 3 जुलै 2018 रोजी न्यायालयाने 28 दिवसांकरता पॅरोल मंजूर केला १ ऑगस्ट रोजी कारागृह हजर राहणे आवश्यक होते. मात्र, पॅरोलवर कारागृहाबाहेर आल्यानंतर तो पसार झाल्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात बाळाराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.