बिलासपूर ( हिमाचल प्रदेश ) - हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई ठाणे क्षेत्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात घंडीर पंचायतीमधील गावामध्ये झाडीत सापडलेल्या नवजाच अर्भकाच्या आई-वडिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. नवजात अर्भकाचे आई आणि वडील दोघेही अल्पवयीन असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
अल्पवयीन मुलगी दहावीमधील विद्यार्थिनी आहे. तसेच तिच्यावर तिच्या भावानेही अत्याचार केला होता. मात्र सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना समजली नाही. या प्रकरणाला दुजोरा देताना बिलासपूरचे एसपी साजू राम राणा यांनी सांगितले की, दोन्ही अल्पवयीन नात्याने भाऊ बहीण आहेत. तसेच पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
२ ऑक्टोबर रोजी घंडीर गावामध्ये झाडीमध्ये एक नवजात अर्भक जिवंत सापडल्याने खळबळ उडाली होती. घंडीरमध्ये एका शेतातील झाडीमध्ये जिवंत अर्भक निळ्या कपड्यामध्ये रक्ताने माखळेल्या असवस्थेत सापडले होते. या बालकाचा काही वेळाने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत बालकाच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला होता.
पोलीस अधीक्षक एसआर राणा यांनी या प्रकरणाला दुजोरा देताना सांगितले की, गेल्या महिन्यात घंडीर पंचायतीमधील झाडीमध्ये एक नवजात अर्भक सापडले होते. या बालकाचा काही काळाने मृत्यू झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दरम्यान, आज पोलिसांनी या अल्पवयीन मुलगा आणि मुलगीला चौकशीसाठी बोलावले होते. आता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. ही अल्पवयीन मुलगा आणि मुलगी नात्याने चुलत भाऊ-बहीण आहेत.