शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याने पार्टनरची हत्या, मृतदेहाचे केले ८० तुकडे; आरोपी गजाआड  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 6:36 AM

मध्य प्रदेशात वर्षभरापूर्वी केलेल्या हत्येची अखेर उकल...

भोपाळ : लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा पार्टनर आफताब पूनावालाने हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशात असा प्रकार उघडकील आला आहे. बहिणीशी प्रेमसंबंध असल्यावरून एकाने व्यावसायिक भागीदाराची हत्या केली व मृतदेहाचे ८० तुकडे करून ते रिवा जिल्ह्यातील दूधमतिया जंगलात फेकून दिले होते. श्रद्धाच्या हत्येची उकल होण्यास सहा महिने लागले होते तर मध्य प्रदेशातील हत्याकांडाची उकल होण्यास वर्ष उलटले.

पश्चिम बंगालमध्येही दारुड्या तरुणाने आपल्या वडिलांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते. आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या व्यक्तीला ठार मारून त्याच्या मृतदेहाचा तुकडे करण्याचे बळ माणसात येते तरी कुठून असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

विकास गिरी व युनुस अन्सारी हे व्यावसायिक भागीदार होते. वर्षभरापूर्वी विकास काही कामासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परतला नाही. तो बेपत्ता झाल्यानंतर चार महिन्यांनी दूधमतिया जंगलात मानवी मृतदेहाचे अवशेष आढळले होते. रिवा जिल्ह्यातील मौगंज पोलिसांनी अधिक शोध घेऊन जंगलात एकूण ८० हाडे हस्तगत केली. 

हे मानवी अवशेष विकासचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी विकासचे मित्र, कुटुंबीय व नातेवाइकांशी चर्चा केली तसेच अन्य स्रोतांकडून माहिती मिळवत त्याच्या खुनाचे गूढ उकलले. पोलिसांनी युनुसला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे

कुटुंबीयांनाही अमान्य- विकास व अन्सारी वन विभागाकडून वृक्षारोपणाचे ठेके घेत. यामुळे विकासचे युनुसच्या घरी येणे-जाणे होते. - युनुसला तीन बहिणी आहेत. त्यांच्यापैकी एकीशी विकासचे कथितरीत्या प्रेमसंबंध होते. ही बाब समोर आल्यानंतर अन्सारी कुटुंबीय संतप्त झाले. - आरोपीने मेहुण्यासोबत मिळून विकासचा खून केला. बहिणीचा विनयभंग केल्याबद्दल विकासचा आपण ३ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री चाकूने भोसकून खून केला, अशी कबुली युनुसने दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट