शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केल आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
4
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
5
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
6
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
7
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
8
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
10
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
11
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
12
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
13
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
14
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
15
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
17
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
18
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
19
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

'क्रौर्याची परिसीमा', वानराची शिकार करुन केली पार्टी ; जुन्नर येथील धक्कादायक घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:52 IST

लॉकडाऊनच्या काळात सर्वच मटणाची दुकाने बंद असल्याने त्यांनी वानराची शिकार केली.

ठळक मुद्देफोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून कारवाई

पुणे : वानराची शिकार करुन ते खाणाऱ्या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वानराचा पाठलाग करुन गलोलच्या साह्याने माकडाला मारुन त्याचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. जुन्नर वनपरिक्षेत्रातील मौजे धालेवाडी  येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.   एकनाथ गोपाळ आसवले (वय 29, रा. फुलवडे, ता.आंबेगाव, जि.पुणे), गणपत शिमगे हेलम (वय 40, रा.धालेवाडी तर्फे मिन्हर, ता.जुन्नर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुन्नर वनपरिक्षेत्रातील मौजे धालेवाडी येथे वानराची शिकार करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

              आरोपी आसवले हा धालेवाडीला गणपत हिलम याच्याकडे आला होता. त्यांना पार्टी करायची होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्वच नॉनव्हेजची दुकाने बंद असल्याने त्यांनी वानराची शिकार केली. सुरुवातीला आपल्या जवळ असणाऱ्या कुत्र्यांंना त्या वानराच्या अंगावर सोडले.  त्यात त्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे तुकडे करुन आपआपसांत वाटून खाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक जयरामेगौडा आर, सहायक वनसंरक्षक डी. वाय. भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.            आरोपींना गुरुवारी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. इतर फरार आरोपीचा शोध सुरु आहे. वानर या वन्यप्राणाची शिकारप्रकरणी 3 वर्षे कैद व 25 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतुद आहे. 

टॅग्स :Junnarजुन्नरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसforest departmentवनविभागMonkeyमाकड