शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

सत्संगमध्ये भेट, नंतर बलात्कार, तरुण ४ तासांच्या पॅरोलवर आला, लग्नानंतर तुरुंगात गेला, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 1:29 PM

तुरुंगात शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार चार तासांच्या पॅरोवर बाहेर येतो आणि एका तरुणीसोबत मंदिरात लग्न करतो.

तुरुंगात शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार चार तासांच्या पॅरोवर बाहेर येतो आणि एका तरुणीसोबत मंदिरात लग्न करतो. पुन्हा तुरुंगात जातो. हे अनोखे लग्न बिहारमध्ये झाले.  तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराने पॅरोलवर येऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. ज्या तरुणीच्या आरोपामुळे शिक्षा भोगावी लागली त्याच तरुणीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.

पश्चिम चंपारणच्या बगाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माछरगाव गावचा रहिवासी राहुल कुमार हाजीपूरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. राहुल लखनऊमध्ये एका सत्संगासाठी कुटुंबासोबत गेला होता. यावेळी त्याची भेट एका २१ वर्षीय तरुणीसोबत होते, या भेटीचे रुपांतर काही दिवसांनी मैत्रीत होते आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते.

मेहुणीचं अपहरण करून तीन महिने केला रेप, मग पत्नी आणि मेहुणीला पाजलं विष

यानंतर तरुण आणि तरुणी दोघेही गोपालगंज येथील थावे दुर्गा मंदिरात आले आणि गुपचूप लग्न करून पती-पत्नी म्हणून राहू लागले, पण अचानक ५ मार्च रोजी मुलीची प्रकृती खालावली. यावेळी तरुणीला प्रियकर राहुल कुमार याने रुग्णालयात दाखल केले, यावेळी पोलिसांनी तरुणीने केलेल्या आरोपानंतर तरुणाविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याखाली राहुल कुमारला अटक करून तुरुंगात पाठवले.

दोघांच्याही कुटुंबीयांना हा प्रकार कळला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणीचे लग्न लावून देण्यास होकार दिला. गोपालगंजच्या सीजेएम न्यायालयात कुटुंबाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. दोघेही प्रौढ असल्याचे आढळून आल्याने न्यायालयाने दोघांनाही लग्न करण्याची परवानगी दिली.त्यासाठी तरुणाने कोर्टाकडून  चार तासांचा पॅरोल मिळवला. लग्नाचे प्रमाणपत्र सादर करुन आता राहुल कुमारच्या सुटकेसाठी अपील करणार आहे, ठावे दुर्गा मंदिरात पार पडलेल्या या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस