सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सहकारी पतसंस्थांपैकी सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेली ठाणे पालघर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी (डीडीआर) संस्थेच्या चक्रव्युहात सापडली आहे. या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर सुमारे ६५ लाखांच्या मनमानी खर्चाच्या आरोपासह मुरबाड, नवी मुंबई, उल्हासनगर शाखांसाठी खरेदी केलेल्या वास्तुंमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाखाली ही शिक्षक पतसंस्था चौकशीच्या फेºयात अडकली आहे.शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकाºयांकडून मनमानी उधळपट्टी केली जात असल्याची खदखद काही वर्षांपासून होती. यावरून त्यांच्या सभा, बैठकांमध्ये शिक्षकांमध्ये हाणामारी, शाब्दीक चकमकीच्या घटना याआधी घडलेल्या आहेत. पदाधिकाºयांविरुद्ध रोष शिगेला गेला आणि डीडीआर कार्यालयाच्या ठाणे शहर शाखेव्दारे या शिक्षक पतसंस्थेच्या कामकाजाची व मोठमोठ्या रकमांच्या खर्चाच्या मनमानीची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र, कारवाई करण्यास विलंब होत असल्यामुळे शिक्षकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत चौकशी केली असता आतापर्यंत एक सुनावणी झाल्याचे आढळून आले.या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार व अनियमीतपणाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानुसार या शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकाºयांची पहिली सुनावणी झाली आहे. यावेळी त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणीची कारवाई केली आहे. तक्रारीस अनुसरून चौकशी सुरू आहे. व्यवहारात अनियमितता आढळून आल्यास आॅडिटसह पुढील कारवाई करू, त्यासाठी आणखी सुनावणी होणार असल्याचे सुतोवाच ठाणे सहकारी संस्था उपनिंबंधक विशाल जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या व्यवहारांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपशिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकाºयांनी ६५ लाख ९५ हजार मनमानी पद्धतीने खर्च केल्याचा आरोप आहे. त्यांचे संचालकपद रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीदेखील तक्रार आहे. या पतसंस्थेच्या शाखा वाढवण्यासाठी मुरबाड, नवी मुंबई व उल्हासनगरमध्ये वास्तू खरेदी केलेल्या आहेत. या तीन शाखांच्या वास्तूंची खरेदी नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप आहे. वाडा येथील शाखेच्या बांधकामासाठी कमी रकमेच्या निविदेऐवजी जादा रकमेची निविदा स्वीकारून बांधकाम सुरू केल्याची देखील शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे.नवी मुंबई शाखेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रारही चौकशी यादीत आहे. किरकोळ खर्च व स्टेशनरी खरेदीत अवास्तव खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये छपाई खर्चासह संगणक खरेदीचादेखील समावेश आहे. कर्मचाºयांची पदोन्नती, त्यांचे वेतनभत्ते यासह आॅडिट फीमध्ये भ्रष्टाचार असल्याची तक्रार आहे. याशिवाय मुख्य इमारतीच्या अवास्तव दुरुस्ती खर्चाचीही चौकशी केली जाणार आहे. पदाधिकाºयांकडून २६ लाख ४० हजार रूपये वसूल करून संचालक पदे रद्द करण्याची मागणी शिक्षकांकडून लावून धरण्यात आलेली आहे.
वास्तू खरेदी भ्रष्टाचारप्रकरणी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:29 AM