जमीर काझीमुंबई - गेल्या पाच महिन्यापासून हक्काच्या मानधनाविना कार्यरत असलेल्या होमगार्डची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकट्या महानगर मुंबईत कार्यरत असलेल्या चार हजारावर जवानांना १५ कोटी ३० लाख २०,६३३ रुपयाची देणी भागवायचे आहे. त्यासाठी आता वित्त विभागाकडून अतिरिक्त निधीची मंजूरी मिळविण्याची आवश्यकता आहे. या खात्याची जबाबदारी सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार होमगार्डना केव्हा न्याय देतात, याकडे राज्यातील ४२ हजारावर जवानांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील होमगार्डच्या जिल्हानिहाय थकीत मानधनाची यादी ‘लोकमत’च्या हातील लागली आहे. त्यामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक जवान तीन हजारावर जवान असलेल्या ठाणे जिल्ह्यात ९ कोटी ७५,८५०० तर पुण्यातील होमगार्डना ८ कोटी ५५ लाख ७१, २५० रुपये भागवावयाचे आहेत. २६ जिल्ह्यातील सर्वात कमी थकीत मानधन हिंगाेली जिल्ह्यातील असून त्यांना १ कोटी ४४ लाख ६५,३०० तर वाशिममधील होमगार्डना १ कोटी ४९ लाख ६३,६०५ भागवावयाचे आहेत.
राज्यातील होमगार्डच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रासह एकुण ३६ ठिकाणी जिल्हा केंद्र आहेत. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांचे संबंधितस्तरावर मानधन काढले जाते. मात्र गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखाचे मानधन थकले असून या आर्थिक वर्षअखेरीसपर्यंत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकुण २७८ कोटी ३८ लाखाची आवश्यकता लागणार आहे.
गेल्यावर्षी जुलैमध्ये त्यांचे मानधन प्रतिदिवस ३०० रुपयावरुन थेट ६७० इतके वाढविण्यात आले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद न केल्याने थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे.* सर्वाधिक थकबाकी जिल्हानिहाय रक्कम अशी :जिल्हा थकबाकीबहन्मुंबई १५,३०२०,६३३ठाणे ९,७५,८५,५००पुणे ८,५५,७१,२५०जळगाव ८,५१,७८३९०नांदेड ७,११,१००००नाशिक ६,६०,५९,३२०सातारा ५,९०,२२५४०सोलापूर ५,६०,८८८००अकोला ३,७९,४४८७५यवतमाळ ३,४५४११८०अमरावती ३,३९५९६२०*कमी थकबाकी असलेले जिल्हेहिंंगोली १,४४,६५,३००वाशिम १४९,६३६०५