दत्ता म्हात्रे
पेण - उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सहायक पोलिस निरीक्षक अशोक भुसाने यांचं फेसबुक अकाऊंट हॅकरने हॅक केल्याची माहिती भुसाने यांनी समाज माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे सायबर पोलीस गुन्हे शाखेमधे याबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत.आता पोलीस अधिकारी वर्गाकडे हॅकर्सनी मोर्चा वळविल्याने सामान्यांचे काय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियाटा गैरवापर करुन अनेकांचे बॅंक अकांऊट फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैसे उकळण्याच्या घटना घडत असतात. काही वेळस अश्लील पोस्ट टाकून पैशाची मागणी केली जाते.
याबाबत सायबर पोलीस गुन्हे शाखेमधे अनेक तक्रारी दाखल होऊन देखील गुन्हा उघडकीस येत नसल्याने ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. आता पोलिस उपनिरीक्षकांना लक्ष करण्यात आले आहे. अशोक भुसाने यांनी सोशल मिडियावर ही माहिती देताना हॅकर भूसाने यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पैशाची मागणी करत आहे. त्यामुळे याबाबत असाच कोणावरही प्रसंग आला असेल तर हॅकरची पैशाची मागणी धुडकावून त्याला पैसे देऊ नये असे भुसाने यांनी सोशल मिडियावर नागरिकांना आवाहन केले आहे.याबाबत सायबर पोलीस गुन्हे शाखेकडे तक्रार नाेंदवण्याचे काम सुरु आहे.