शिरपूर/धुळे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने अंजदे येथे सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर बुधवारी रात्री धाड टाकून एक ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करुन मध्य प्रदेशातील चार जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी अटक केलेल्यांवर महाराष्ट्र दारुंबदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणातील मद्यासाठी आणि आयसर, महिंद्रा बोलेरो पिकअप, हिरो होंडा मोटारयाकलसह एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकाला नऊ जून शिरपूर नजीक असलेल्या अंजदे परिसरात बंद अवस्थेत असलेल्या पद्मावती कॉटन जिनिग मुंबई इंदोर हायवेच्या बाजूला एका बंद जिनिगमध्ये विविध देशी बनावटीचे देशी ब्रँडचे देशी मद्याचा साठा तसेच बनावटीचे दारुचा कारखाना असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी मध्य प्रदेशातील या चार जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास संताजी लाड, मनोज चव्हाण, राज्य उप्दान शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य तसेच धुळे जिल्हा पोलिस पथके तसेच शिरपूर तालुका पथकाने केली असून पुढील कारवाई करीत आहेत. अश्या पद्धतीच्या या परिसरात अजूनही करण्याचे त्यांनी या वेळेस संकेत महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे संताजी लाड तसेच मनोज चव्हाण यांनी दिले आहेत.