मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, हिंगणघाट आणि औरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता माटुंगा रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत चुंबन घेऊन छेडछाड केली. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना २६ जानेवारीला दुपारी घडली आहे.
किळसवाणे! विकृताने रेल्वे पुलावर एकट्या तरुणीला गाठले; चुंबन घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 13:44 IST
हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
किळसवाणे! विकृताने रेल्वे पुलावर एकट्या तरुणीला गाठले; चुंबन घेतले
ठळक मुद्दे ही घटना २६ जानेवारीला दुपारी घडली आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत चुंबन घेऊन छेडछाड केली. विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.