ठळक मुद्दे पीटर मुखर्जी यांना भायखळाच्या आर्थर रोड जेलमधून रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. एकामध्ये १०० टक्के तर इतर ३ रक्तवाहिन्यांत ९० टक्के ब्लॉकेज आहेत.
मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांना ह्रदयविकाराच्या उपचारासाठी १५ दिवस क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच पीटर मुखर्जी यांना भायखळाच्या आर्थर रोड जेलमधून रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पीटर मुखर्जीच्या प्रकृतीबाबत अहवाल १२ जुलैपर्यंत सादर करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे. पीटर यांच्या ४ रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आहेत. त्यापैकी एकामध्ये १०० टक्के तर इतर ३ रक्तवाहिन्यांत ९० टक्के ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांना मे महिन्यात प्रकृती बिघडल्यामुळे जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. छातीत कळा येत असल्यामुळे त्याच्यावर दिवसभर वैद्यकीय चाचण्या पार पडल्या. त्यावेळी पीटर यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अँजिओग्राफी करण्याची आवश्यकता असल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. पीटर यांच्या ४ रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आहेत. त्यापैकी एकामध्ये १०० टक्के तर इतर ३ रक्तवाहिन्यांत ९० टक्के ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर पीटर यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरच्या आवश्यक उपचार करणे गरजेचे असल्याचे सांगत पीटर यांच्या वकिलांनी मुंबई कोर्टाने या उपचारासाठी परवानगी मिळवी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई कोर्टाने परवानगी देत पीटरवरील उपचाराचा अहवाल १२ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.