शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Mukesh Patel : गुजरातमधील पेट्रोल पंपावर फसवणूक, मंत्री मुकेश पटेलांनी रातोरात पंप केला सील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 10:59 AM

Petrol Pump sealed in Surat : गुजरात सरकारमधील पेट्रोकेमिकल मंत्री मुकेश पटेल हेच स्वत: पेट्रोल पंपावर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. यानंतर सुरत येथील पेट्रोल पंपावर कपात करणे या पंपमालकाला महागात पडले.

सुरत : केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात तर भाजपाशासित राज्यांमध्ये व्हॅट कमी केल्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Deisel Petrol Price) सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. असे असतानाही मोजमापापेक्षा कमी इंधन मिळत असल्याच्या तक्रारीने आता अनेक ठिकाणचे नागरिक त्रस्त झाले आहेत.

यातच गुजरात (Gujarat) सरकारमधील पेट्रोकेमिकल मंत्री मुकेश पटेल (Minister Mukesh Patel) हेच स्वत: पेट्रोल पंपावर  (Petrol Pump) फसवणुकीचा बळी ठरले आहेत. यानंतर सुरत (Surat) येथील पेट्रोल पंपावर कपात करणे या पंपमालकाला महागात पडले. आपली फसवणूक होत असल्याचे दिसताच मुकेश पटेल यांनी रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांना फोनाफोनी करून हा पेट्रोल पंपच सील (Petrol Pump Seizes) करून टाकला.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पेट्रोलियम मंत्री आणि ओलपाडचे भाजपा आमदार मुकेश पटेल हे रविवारी रात्री उशिरा त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नियारा पेट्रोल पंपावर त्यांच्या खासगी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत ना पोलीस होते ना कोणता ताफा होता. कारण तो अचानक पेट्रोल पंप तपासणीसाठी गेले होते.

यादरम्यान पंप कर्मचाऱ्यांला डिझेल भरण्यास सांगितले. परंतु, पंपाच्या मीटरवर आकडे मात्र स्पष्ट दिसत नव्हते. याचे कारण त्यांनी पंपावरच्या कर्मचाऱ्यांकडे विचारले. तसेच, पंपाचे मीटर बंद आहे, मी असेच डिझेल भरू का? अशी विचारणा मुकेश पटेल यांनी पंपाच्या व्यवस्थापकाकडे केली असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याचा बचाव करत मीटर मागे असल्याचे सांगितले.

रात्रीच पंप झाला सील मंत्री मुकेश पटेल यांनी आधीच आपल्या कारमध्ये 4 हजार रुपये किमतीचे डिझेल भरले. मात्र पंपाच्या मीटरमध्ये पैसे व डिझेलची रक्कम स्पष्टपणे दिसत नव्हती. यावर त्यांनी पंपाच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, तो नीट काही सांगू शकला नाही. यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या घोटाळ्याची माहिती दिली. तत्काळ पुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी रात्रीच पंप सील केला.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पेट्रोल पंपावरच्या 12 नोझलपैंकी 6 नोझलला सील केले आहे. पेट्रोल पंपावरून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुकेश पटेल यांनी म्हटले आहे. तसेच, गुजरातच्या सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलGujaratगुजरात