शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

प्लॅन २०४७! PFI कार्यकर्त्याकडून मिळालं पुस्तक; मिशन 'बयाथीस' चा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 2:56 PM

अलीकडेच, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याकडून 'प्लॅन २०४७' नावाचं एक पुस्तक जप्त केलं.

नवी दिल्ली - देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी या संस्थेशी संबंधित २०० हून अधिक लोकांना देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ताब्यात घेण्यात आले. ३० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात शेकडो कार्यकर्त्यांना जेरबंद केले. पकडलेल्यांमध्ये पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलामचे नाव समाविष्ट आहे. PFI ने सरकारविरूद्ध हिंसक कृत्य करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी मिशन 'बयाथीस' चा मार्ग निवडण्याची योजना आखली जात होती असं सूत्रांकडून समोर आले आहे. प्लॅन २०४७ नावाचं पुस्तक हाती लागलंअलीकडेच, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याकडून 'प्लॅन २०४७' नावाचं एक पुस्तक जप्त केलं. हा छापा पीएफआय आणि त्याच्या राष्ट्रविरोधी कारवाईचा देशव्यापी कृतीचा एक भाग होता. पीएफआयचे अधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यात आणि भरती करण्यात सामील होते. या तरुणांना ISISसारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी ढकलले जात होते असं पीएफआयविरूद्ध NIA च्या मेगा ऑपरेशनमध्ये दिसून आले. 

NIA आणि ED नं पीएफआयच्या उच्च नेते आणि सदस्यांच्या घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले, ज्यात संघटनेच्या सदस्यांनी दहशतवाद निधी, प्रशिक्षण शिबिरे आणि ते लोकांचे आयोजन केले होते याचे पुरावे सापडले आहेत. आरोपी धर्माच्या आधारे विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढविण्याच्या उद्देशाने हिंसक आणि दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करीत आहेत असा NIA नं दावा केला. 

बयाथीस म्हणजे 'मौत का सौदागर'जप्त केलेल्या चिठ्ठीत याचा खुलासा झाला की, PFI सरकारी संस्था, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वामसेवक नेते आणि संघटना यांना निशाणा बनवण्याचा प्लॅन आखत होती. माहितीनुसार, तिहार तुरूंगात ज्येष्ठ नेत्यांना ठेवल्यानंतर पीएफआय कार्यकर्ते संतापले आहेत. पीएफआयने सरकारविरूद्ध हिंसकपणे सूड उगवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएफआयने बयाथीसचा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ हिंदीत मौत का सौदागर असा होता. ज्यात बदला घेण्यासाठी मरण्याचे किंवा मारण्याचा निश्चिय केला आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवाद