शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

किरण गोसावीने रचला कट?; गोसावी, डिसूजाच्या सीडीआरमधून उलगडणार आरोपांचे गूढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 6:52 AM

लवकर होणार गुन्हा दाखल

मुंबई : कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने मोठा कट आखल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. दुसरीकडे गोसावी आणि सॅम डिसुजाच्या सीडीआरमधूनदेखील या खंडणीच्या आरोप प्रकरणाचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. त्यानुसार,  मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणात किरण गोसावीसह सॅम डिसूजा विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही समजते आहे.

मुंबई पोलीस प्रभाकर साईलच्या तक्रारीवरून खंडणी, तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत. पैसे उकळण्यासाठी किरण गोसावीने या प्रकरणात स्वतःची ओळख एनसीबी अधिकारी म्हणून केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गोसावीने ही ओळख पूजा ददलानीला सांगितली होती, असेही समजते आहे. त्याने पैसे उकळण्यासाठी खोटी ओळख केल्याचे पथकाच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. या प्रकरणात कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग तूर्तास तरी चौकशीत आढळून आलेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात पूजा ददलानीचा जबाब खूप महत्त्वाचा आहे. मुंबई पोलिसांनी त्यांनाही समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.  

पूजा यांनी प्रकृतीचे कारण देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे.  पूजा ददलानी येत्या शुक्रवारी चौकशीला येणार असल्याची शक्यता आहे. या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी मुंबई पोलीस एसआयटी टीम एनसीबी अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी करणार आहे.           

सॅम डिसूजा आणि किरण गोसावीचे ते ३० कॉल 

मुंबई पोलिसांना किरण गोसावी आणि सॅम डिसूजाचे सीडीआर मिळाले आहेत. त्यामध्ये कार्डेलिया क्रूझवरील कारवाईनंतर मध्यरात्री ते  पहाटेपर्यंत दोघांकडून  वेगवेगळ्या क्रमांकावर ३० कॉल  करण्यात आले होते. गोसावी आणि डिसूजा यांनी हे कॉल  कुणाला केले होते? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू 

मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळाले आहेत. त्यानुसारही तपास सुरू आहे. हे सीसी टीव्ही फुटेज लोअर परळ परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे. त्याच ठिकाणी २५ कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पथक तपास करीत आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थ