शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

अमरावतीत होणार होती श्याम मानव यांची हत्या; एटीएसची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 3:22 AM

पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात.

मुंबई : पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. पण विदर्भात ते सॉफ्ट टार्गेट ठरु शकतात, असा विचार करून पांगारकरने अमरावतीची निवड केली होती, अशी माहिती एटीएसने सोमवारी न्यायालयात दिली.३१ आॅगस्टला एटीएसने पांगारकरला सोबत घेऊन अमरावतीत रेकी केलेले ठिकाण गाठले. तेथे पंचनामा केल्याचे न्यायालयात सांगितले. तो पंचनामाही न्यायालयात सादर केला. त्याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर ३१ तारखेला एटीएसच्या हाती लागला. त्यात तो अमोल काळेच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्याचे एटीएसच्या पथकाने न्यायालयात सांगितले. त्याने काळेला केलेले संदेशही एटीएसला मिळाले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या कर्नाटकच्या विशेष पथकाकडून पांगारकरबाबत माहीती मागविण्यात आली होती. त्यात विशेष पथकाने अटक केलेल्या अन्य आरोपींजवळून जप्त केलेल्या डायरीत पांगारकरच्या नावाचा उल्लेख असल्याचेही यावेळी नमूद केले.पांगारकरने जालना येथे स्फोटक प्रकरणातील अन्य आरोपींसह काळेला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे. पांगारकरने स्वत:ही ते प्रशिक्षण घेतले. यासाठीची आर्थिक रसद पांगारकरने पुरवली होती.खात्यातील रकमेचा आकडा चढाएटीएसने पांगारकरच्या तीन बँक खात्यांचा आर्थिक व्यवहार मिळाला आहे. यामध्ये बँक आॅफ महाराष्ट्रच्या २०१७ ते २०१८, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या २०१० ते २०१८ आणि सुंदरलाल सावजी अर्बन को. आॅप. बँकेतील २००६ ते २०१८ मधील आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे, असे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसा आला-गेला, तसेच मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.प्राजी म्हणून प्रसिद्ध : पांगारकर हा प्राजी म्हणूनही सर्वांच्या परिचयाचा होता. याच नावाने तो वावरत होता.जालन्यात पाच गुन्हे : पांगारकर विरुद्ध १९९८ पासून ते २००५ पर्यंत जालना येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात उघड झाली. यात दंगल घडविणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.वैभव राऊतला दिली दुचाकीपांगारकरने बनावट वाहन क्रमांक असलेली दुचाकी दिल्याचेही तपासात समोर आले. या दुचाकीबाबतही अधिक तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.कुटुंबीयांसोबत ५ मिनिटे : राऊतच्या पत्नीसह कळसकर, पांगरकर, गोंधळेकर यांच्या नातेवाईकांना पाच मिनिटे बोलण्यासाठी परवानगी मिळाली होती.जप्त केलेली स्फोटकेचनालासोपाऱ्यातून जप्त केलेल्या साहित्याबद्दल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल एटीएसला मिळाला असून त्यात ही स्फोटके असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एटीएसच्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. जालन्यातील ज्या फार्महाऊसवर आरोपींनी बॉम्ब तयार केले आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले त्या फार्महाऊसवरील नमुने घेऊन तही एटीएसने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविले आहेत. तसेच पांगारकरच्या हस्ताक्षराचे नमुने तसेच आवाजाचे नमुनेही घेतले आहेत, असा तपशील दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय