इंदूर : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली असताना, काही लोक मात्र कमाईसाठी लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. असाच एक जीवघेणा प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
ग्लुकोज पाणी आणि मिठाचे मिश्रण करून तयार करण्यात आलेल्या बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या सुरतमधील आंतरराज्य टोळीचा गुजरात पोलिसांनी सुरतमध्ये पर्दाफाश करून सहा जणांना अटक केली, असे इंदूरच्या विजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक तहजीब काजी यांनी सांगितले.हे रेमडेसिविर खरे असल्याची बतावणी करून ते अवाजवी किमतीने सर्रास विक्री केले जात होते, असे चौकशीतून आढळले. या टोळीने सुनील मिश्राच्या मदतीने गेल्या महिनाभरात अशा १,२०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचा मध्य प्रदेशात पुरवठा केला, असे चौकशीतून निष्पन्न झाले गुजरातमध्येअटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये कौशल व्होराचा समावेश आहे. या १,२०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शनपैकी २०० इंदूरहून शेजारच्या देवास जिल्ह्यात पाठविण्यात आली. तर अन्य ५०० इंजेक्शन्स जबलपूरमधील सपन जैनकडे सुपूर्द करण्यात आली होती.