शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, द्विशतक ठोकत 212 जागांवर घेतली आघाडी; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
7
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
9
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
10
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
12
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
15
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
16
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
17
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
18
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 

PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 6:54 PM

PNB Bank : नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ठळक मुद्दे हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईलतर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल.

मुंबई - बहुचर्चित पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या ईडीने जप्त केलेल्या महागड्या कार आणि वस्तूंचा २७ फेब्रुवारी आणि ३, ४  मार्चला लिलाव होणार आहे. नामांकित चित्रकारांच्या कलाकृती हे या लिलावाचे खास आकर्षण ठरू शकते. कोट्यावधी रुपयांच्या या कलाकृती ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालय) लिलावात काढल्या आहेत. नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल. हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे.कोणाची आहेत महागडी चित्रं ?* शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’* एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२ * व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रेईडीने जप्त केलेल्या या मालमत्तेचा आता न्यायालयाच्या परवानगीने लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. या लिलावात अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकले जाईल, असा अंदाज सॅफ्रनआर्ट संस्थेने व्यक्त केला आहे. एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२’ या चित्राचाही तितक्याच किमतीला लिलाव होईल. त्याखालोखाल व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे लिलावात असतील.खास आकर्षणआंतरराष्ट्रीय ब्रँडच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळंरोल्स रॉईस मोटार

लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११,३६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी हा ईडीच्या रडारवर आहे. ईडीने आतापर्यंत नीरवची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्त संपत्तेमध्ये नीरवच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर उभ्या होती असलेल्या अलिशान कारचा देखील समावेश आहे. मंगळवारी ईडीने जप्त केलेल्या कार मध्ये रॉल्स रॉईस घोस्ट, पोर्श पनमेरा, मर्सिडिज, फॉर्च्यूनर, इनोव्हा अशा ८६ कोटी रुपयांच्या ८ कारसह काही मौल्यवान दागिने हस्तगत केले आहे. नीरवच्या आजतागायत २९ संपत्ती ईडीने हस्तगत केली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या  हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळांसह आणि रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव करण्यात येणार आहे.

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

 

नीरव मोदीच नव्हे, तर हे पाच जण घोटाळा करून झाले पसार

 

पीएनबी घोटाळा; अखेर नीरव मोदी फरार घोषित

 

PNB Scam : पीएमएलए कोर्टाकडून PNB बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPrabhadeviप्रभादेवी