पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणातील (PNB Scam) घोटाळेबाज मेहुल चोक्सी (Mehul Choksi) गेल्या काही दिवसांपासून अँटिग्वामधून गायब झाला होता. त्याला डॉमिनिकामध्ये ट्रेस करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता अँटिग्वा पोलिसांनी डॉमिनिका प्रशासनाशी संपर्क साधला आहे. (Fugitive diamond merchant Mehul Choksi Punjab National Bank loan fraud case has been captured from Dominica)गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, याचा अंदाज आल्यामुळे मेहुल चोक्सी अँटिग्वामधून पसार झाल्याचे सांगितले जात होते.
Mehul Choksi arrested: फरार मेहुल चोक्सी सापडला; अँटिग्वामधून बोटीतून पळालेला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:00 AM